Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सचिन डोंगरेला जेलमध्ये सिम कार्ड कोणी पुरवले? : कसून चौकशी सुरू नालसाब मुल्ला खून प्रकरण

सचिन डोंगरेला जेलमध्ये सिम कार्ड कोणी पुरवले? : कसून चौकशी सुरू
नालसाब मुल्ला खून प्रकरण



सांगली : खरा पंचनामा

राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आणि पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार नालसाब मुल्ला याच्या खून प्रकरणी सचिन डोंगरे याचा जेलमधून ताबा घेऊन त्याला अटक करण्यात आली आहे. त्याने या खून प्रकरणातील संशयिताना जेलमधून मोबाईलवर अनेकवेळा संपर्क साधला होता. सचिनला जेलमध्ये मोबाईल त्याचे सिमकार्ड कोण पुरवले याचा पोलिस कसून तपास करत आहेत. याबाबत त्याच्याकडे चौकशी सुरू आहे.


पोलिसांच्या चौकशीत डोंगरे याने कटाची कबुली दिली आहे. त्याने दिलेल्या माहितीची पोलिस पडताळणी करत आहेत. या खून प्रकरणी सनी कुरणे (रा. जयसिंगपूर), विशाल कोळपे (रा. लिंबेवाडी, ता. कवठेमहांकाळ), स्वप्नील मलमे (रा. खरशिंग, ता. कवठेमहांकाळ), रोहित मंडले (रा. खरशिंग), प्रशांत ऊर्फ बबलू चव्हाण, ऋत्विक माने (रा. कोकळे) यांना यापूर्वी अटक केली आहे.

नालसाबचे शंभर फुटी रस्त्यावर बाबा चौकात निवासस्थान आहे. गेल्या शनिवारी चौघांनी गोळीबार केला. मुल्लाच्या छाती व पोटावर गोळ्या झाडल्यानंतर हल्लेखोर पसार झाले. दरम्यान, तिघांना अटक केली. मलमे तीन साथीदारांसह माने चौकात आला. स्वप्नील व सनी यांनी आठ गोळ्या झाडल्या. विशाल कोळपेने धारदार एडक्याने हल्ला चढवला. त्यात मुल्लाचा मृत्यू झाला. हल्लेखोरांच्या मदतीसाठी आलेल्या तिघांनाही अटक केली. 

खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार सचिन डोंगरे हा ‘मोका’ कारवाईअंतर्गत कळंबा कारागृहात होता. तेथूनच त्याने कट रचल्याची कबुली हल्लेखोरांनी दिली. त्यानुसार पोलिसांनी डोंगरे याला अटक केली. त्याला दि. 2 जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याला मोबाईल आणि सीम कार्ड कोण पुरवले याचा शोध घेतला जात आहे. त्याने कटाची कबुली दिली असली तरी त्या माहितीची पडताळणी सुरू असल्याचे विश्रामबागचे पोलिस निरीक्षक निरीक्षक संजय मोरे यांनी सांगितले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.