हिमाचल प्रदेशात ढगफुटी, उत्तराखंडमध्ये भूस्खलन!
नवी दिल्ली : खरा पंचनामा
देशभरात मान्सून सक्रीय झाला आहे. देशाभरातील अनेक राज्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसामुळे काही डोंगराळ भागातील लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. उत्तराखंडमध्ये काही भागात भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. तर शिमल्यात ढगफुटी झाली आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने उत्तराखंडमध्ये रेड अलर्ट तर हिमाचल प्रदेशमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
पावसानंतर मुंबई, दिल्ली सारख्या मोठ्या शहरांमध्येही सखल भागांमध्ये पाणी साचल आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील 48 तासांत देशातील विविध भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.
मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाची संततधार सुरू आहे. मुसळधार पावसामुळे देशात काही ठिकाणी ढगफुटी, भूस्खलन झाल आहे. तर पर्वतीय भागात जोरदार बर्फवृष्टी सुरु आहे. तर राजधानी दिल्ली येथे अनेक भागांमध्ये रविवारी सकाळपासून पाऊस सुरु आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.