अजित पवारांवर कोणताही अन्याय झालेला नाही : जयंत पाटील
मुंबई : खरा पंचनामा
अजित पवार यांच्यावर कोणताही अन्याय झालेला नाही. आमच्या सर्वांच्या एकमतानेच दिल्लीचे राष्ट्रीय स्तरावरचे निर्णय झालेले आहेत. राज्य स्तरावर काम करणाऱ्या माझ्या सारख्या व्यक्तीने राष्ट्रीय स्तरावरच्या प्रश्नांवर प्रतिक्रिया देणं योग्य नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. नवीन कार्यकारी अध्यक्षांच्या निवडीनंतर ते माध्यमांशी बोलत होते.
ते म्हणाले, आमच्या पक्षाची राष्ट्रीय मान्यता संकटात आलेली होती. या सगळ्यांना वेगवेगळ्या जबाबदारी देवून शरद पवारांनी कामाला लावलेलं आहे. वेगवेगळ्या नेत्यांवर वेगवेगळी जबाबदारी दिलेली आहे. त्यामुळे पुन्हा राष्ट्रीय स्तरावरची मान्यता मिळेल, या दृष्टीने आमचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत.
पाटील म्हणाले, भाकरी परतवलेली नाही तर नवीन लोकांवर जबाबदारी दिलेली आहे. एक नवी टीमवर वेगवेगळ्या जबाबदारी देवून कामाला सुरुवात झालेली आहे. जे पक्ष ठरवेल तसंच वागायचं असतं. राष्ट्रीय स्तरावरुन जे आदेश येतील ते राज्याच्या विभागाने मान्य करायचेच असतात. तुम्ही किती म्हटलात तरी आम्ही सर्व एकमताने एकसंघ आहोत", अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.
"इथे कुठेही घराणेशाही दिसत नाहीय. कारण प्रफुल्ल पटेल यांनादेखील जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच महासचिव यांच्यावरही अन्य राज्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पक्षाला वाढवण्यासाठीच हे प्रयत्न सुरु आहेत. अजित पवार महाराष्ट्राच्या विधानसभेत विरोधी पक्षनेते आहेत. त्यांच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे", असं जयंत पाटील म्हणाले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.