Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीत मोर, लांडोरची शिकार : नागरिकांनी पाठलाग करून अल्पवयीन मुलास पकडले

सांगलीत मोर, लांडोरची शिकार : नागरिकांनी पाठलाग करून अल्पवयीन मुलास पकडले



सांगली : खरा पंचनामा

सांगलीमधील जुना बुधगाव रस्त्यावरील समाजकल्याण कार्यालयानजिक असणाऱ्या संभाजी कॉलनी येथे मोर आणि लांडोरची शिकार झाल्याची घटना उघडकीस आली. शिकार करून घेवून जाणाऱ्या टोळीचा परिसरातील नागरिकांनी पाठलाग केला. नागरिकांनी एका अल्पवयीन मुलास पकडून ठेवले. यानंतर घटनास्थळी शहर पोलीस, प्राणीमित्रांनी घटनास्थळी धाव घेतली. 

ही घटना घडल्यानंतर वनविभागाकडेही संपर्क साधण्यात आला. मात्र, तीन तास उलटल्यानंतरही वनविभागाचा एकही कर्मचारी घटनास्थळी फिरकला नाही. राष्ट्रीय पक्षाची शिकार झाल्यानंतरही वनविभागास कोणत्याही प्रकारचे गांभीर्य नसल्याची टीका परिसरातील नागरीकांनी केली.

जुना बुधगाव रस्ता परिसरातील वाल्मिका आवास योजना परिसरालगत संभाजी कॉलनी आहे. याठिकाणी शेतीचा परिसर असल्याने मोरांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. आज शनिवारी सकाळी एक टोळके जाळ्या घेवून शेतात बसले होते. सकाळी त्यांनी एक मोर आणि एक लांडोरची शिकार केली. त्यानंतर ते पोत्यात भरून निघाले होते. दरम्यान, परिसरातील काही सजग नागरिकांना संशय आला. त्यानंतर टोळीतील महिलांसह मुलांनी पोत खाली टाकत पळ काढला.

टोळीने पळ काढताच नागरिकांनी पाठलाग सुरू केला. पाठलाग करून एका अल्पवयीन मुलास पकडण्यात आले. टोळीतील अन्य पसार होण्यात यशस्वी झाले. पोते उघडल्यानंतर मोरांची शिकार झाल्याचे निदर्शनास आले. मोरांची शिकार झाल्याने नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. प्राणीमित्रांसह पोलिसांनी वनविभागाशी संपर्क साधला. मात्र, कोणताही प्रतिसाद देण्यात आला नाही. शेवटी प्राणीमित्र आणि पोलिसांनी मोराचे मृतदेह घेवून वनविभाग गाठला. सायंकाळपर्यंत कोणताही पंचनामा करण्यात आला नव्हता.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.