पत्नीचा मोबाईल हिसकावून घेतला अन पती पोहोचला हॉस्पिटलमध्ये!
ग्वाल्हेर : खरा पंचनामा
मध्यप्रदेशातील ग्वाल्हेरच्या माधवी नगर इथे एका महिलेने पतीच्या गुप्तांगावर उकळत तेल टाकलं, कारण त्याने तिला शेजाऱ्यासोबत फोनवर बोलण्यास मनाई केली होती. सुनील धाकड या तरूणाने आपली पत्नी भावना हिला शेजारी राहणाऱ्या व्यक्तीसोबत फोनवर बोलण्यास मनाई केली होती.
पण त्याची पत्नी भावनाने पतीच्या सांगण्याकडे दुर्लक्ष केलं आणि तिने शेजाऱ्यासोबत बोलणं बंद केलं नाही. त्यामुळे एक दिवस संतापलेल्या सुनीलने पत्नीकडून मोबाइल हिसकावून घेतला. त्यानंतर पत्नी इतकी रागावली की, तिने धक्कादायक कृत्य केलं.
पोलिसांकडून सांगण्यात आलं की, सुनील आपल्या घरात झोपलेला होता. त्याचवेळी भावनाने किचनमध्ये तेल गरम केलं आणि ते तेल झोपलेल्या सुनीलच्या गुप्तांगावर टाकलं. ज्यामुळे सुनील गंभीर जखमी झाला. इतकंच नाही तर यानंतर भावना घरातून फरार झाली. सुनीलवर सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तर पोलिसांनी भावनाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पीडित सुनीलने पोलिसांना सांगितलं की, मोबाइल हिसकावून घेण्याचा पत्नीला इतका राग आला की, तिने रात्री मी झोपेत असताना माझ्या गुप्तांगावर उकळत तेल टाकलं आणि पळून गेली. सुनीलने मदतीसाठी आरडाओरड केली तेव्हा काही शेजारी त्याच्या घरात आले. त्यांनीच त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.