Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

जिल्ह्यातील ११ पोलिस अंमलदारांची एलसीबीकडे बदली

जिल्ह्यातील ११ पोलिस अंमलदारांची एलसीबीकडे बदली



सांगली : खरा पंचनामा

जिल्ह्यातील ११ पोलिस अंमलदारांची एलसीबीकडे बदली करण्यात आली आहे. रविवारी पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी या बदल्यांचे आदेश काढले आहे. बदली झालेल्यांमध्ये एक सहायक उपनिरीक्षक, चार हवालदार, दोन पोलिस नाईक, चार पोलिस शिपाई यांचा समावेश आहे. 

विश्रामबागकडील दऱ्याप्पा बंडगर, इस्लामपूर येथील अरूण पाटील, विश्रामबाग पोलिस ठाण्याकडील अनिल ऐनापुरे, मुख्यालयातील सोमनाथ पतंगे, दहशतवादविरोधी पथकाकडील रोहन घस्ते, मुख्यालयातील अभिजित ठाणेकर, आष्टा येथील सूरज थोरात, मिरज ग्रामीणकडील अनंत कुडाळकर, सांगली शहरकडील प्रकाश पाटील, मिरज शहरकडील अमर नरळे, बदली आदेशाधीन बाबासाहेब माने यांचा या बदल्यांमध्ये समावेश आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.