Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

एमपीएससीचा अंतिम निकाल जाहीर सांगलीचा प्रमोद चौगुले राज्यात प्रथम तर कोल्हापूरचा शुभम पाटील राज्यात दुसरा

एमपीएससीचा अंतिम निकाल जाहीर
सांगलीचा प्रमोद चौगुले राज्यात प्रथम तर कोल्हापूरचा शुभम पाटील राज्यात दुसरा



मुंबई : खरा पंचनामा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) गेल्या वर्षी घेण्यात आलेल्या राज्य सेवा मुख्य परीक्षेचा 2021 चा अंतिम निकाल दिनांक आज जाहीर करण्यात आला.

या परीक्षेमध्ये सांगलीच्या प्रमोद बाळासाहेब चौगुले याने सर्वसाधारण उमेदवारांमधून राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. तर सोनाली अर्जुनराव म्हात्रे हिने मुलींमधून पहिला क्रमांक पटकावला आहे. तसेच विशाल महादेव यादव हा मागासवर्ग उमेदवारांमधून राज्यात प्रथम आला आहे. हा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. 

या वर्षी 28 फेब्रुवारी रोजी या परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर झाली होती आणि त्यानंतर आता याच मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल एमपीएससीकडून संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे.

या परीक्षेत सांगलीचा प्रमोद चौगुले सलग दुसऱ्यांदा राज्यात पहिला आला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर कोल्हापूरच्या शुभम पाटीलने बाजी मारली आहे. मुलींमध्ये बीडच्या सोनाली म्हात्रे हिने पहिला क्रमांक पटकवला असून एकूणात ती राज्यात तिसरी आली आहे. प्रमोद चौगुले हा सध्या उद्योग उपसंचालक या पदावर नाशिक येथे कार्यरत आहे. गेल्या वर्षीही तो राज्यात पाहिला आला होता.

राज्यात पहिला आलेल्या प्रमोदचे वडील टेम्पो चालक आहेत तर आईने शिवणकाम करून संसाराचा गाडा चालवला. 2020 मध्ये प्रमोद चौगुले याने एमपीएससीमध्ये पहिला येण्याचा बहुमान मिळाला होता आणि त्यानंतर त्याची उद्योग विभागात उपसंचालक म्हणून नियुक्ती झाली होती.

राज्यात दुसरा आलेला शुभम पाटील हा मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील साजनी या गावचा आहे. शुभमचे वडील गणपती पाटील हे प्राथमिक शिक्षक तर आई गृहिणी आहे. लहानपणापासून सरकारी अधिकारी व्हायचं हे शुभमचं ध्येय, आणि त्याला त्याच्या आई-वडिलांनी साथ दिली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.