आळसंद येथे देशी बनावटीचे पिस्तूल विक्री करण्यासाठी आलेला अल्पवयीन ताब्यात
विटा : खरा पंचनामा
खानापूर तालुक्यातील आळसंद येथे जिवंत कडतुसासह देशी बनावटीचे पिस्तूल विक्रीसाठी आणलेल्या एका अल्पवयीन तरुणास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून ४० हजाराचे पिस्तूल ५०० रुपयाचे काडतूस आणि दुचाकी असा ९५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली.
पोलीस अधिक्षक डॉ. बसवराज तेली यांनी शुक्रवार आणि शनिवारी तालुक्यात कोंबीग ऑपरेशन, नाकाबंदी, ऑलआउट' ऑपरेशन राबवा असे आदेश दिले होते. त्यानुसार विट्यात पोलीस गस्त घालत होते. त्यावेळी विटा ते खानापूर रस्त्यावर बळवंत कॉलेजजवळच्या टेंभू योजनेच्या कॅनॉलवर एक युवक देशी बनावटीचे पिस्तुल विक्रीसाठी आल्याची माहिती निरीक्षक डोके यांना मिळाली. त्यांच्या सूचनेनुसार पथकाने सापळा रचून युवकाला ताब्यात घेवून त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला एक मॅगझीन असलेले त्याच्या मुठीस दोन्ही बाजुस प्लॅस्टिकचे काळया रंगाचे कव्हर असलेले देशी बनावटीचे पिस्तुल व एक जिवंत काडतूस होते. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तुल, एक जिवंत काडतुस आणि मोटर सायकल असा मुददेमाल जप्त केला आहे.
पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक बाळासाहेब कन्हेरे, अमर सुर्यवंशी, राजेंद्र भिंगारदेवे, सुरेश भोसले, शशिकांत माळी, महेश संकपाळ, अक्षय जगदाळे, महेश देशमुख आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.