मला विरोधी पक्षनेते पदात इंटरेस्ट नव्हता, संघटनेत पद द्या!
मुंबई : खरा पंचनामा
मला विरोधी पक्षनेते पदामध्ये काही इंटरेस्ट नव्हता. आता मला संघटनेत कोणतही पद द्या, मी त्या पदाला न्याय देईल, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केलेय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापनदिनाच्या सोहळ्यात अजित पवार यांनी संघटनेतील कोणतेही पद देण्याची मागणी पक्षाकडे केली आहे. अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्व काही ठीक आहे का? अशा चर्चेला सुरुवात झाली आहे.
पक्षातील कोणतेही पद द्या, असे म्हणत अजित पवार यांनी प्रदेशाध्यक्ष पदावर दावा केला आहे का ? असा सवालही उपस्थित झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापनदिनाच्या सोहळ्यात अजित पवार यांची संघटनेतील कोणतेही पद देण्याची पक्षाकडे मागणी केली. संघटनेत कोणतेही पद द्या, पदाला न्याय देईन, असे अजित पवार म्हणाले. जयंत पाटील मागील पाच वर्षांपासून प्रदेशाध्यक्षपदावर कार्यरत आहेत. प्रत्येकी 3 वर्षांनंतर पद बदलण्याची पक्षाचा घटनेत तरतूद आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या या वक्तव्यानंतर शरद पवार काय भूमिका घेणार ? याकडे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षात दोन कार्यकारी अध्यक्षांची नियुक्ती केली. नव्या कार्यकारी पदाची जबाबदारी प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर सोपवली होती. त्यानंतर अजित पवार नाराज असल्याच्या चर्चाही समोर आल्या होत्या. शरद पवार कार्यकारी पदाची घोषणा करताना अजित पवार स्टेजवर काय करत होते, याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या सर्व घटनेनंतर अजित पवार नाराज नाहीत, असे शरद पवारांनी सांगितले होते. अजित पवार यांनीही आपण नाराज नसल्याचे सांगितले होते. पण आज अजित पवार यांनी मनातील खंत बोलून दाखवली. मला विरोधी पक्षनेते पदामध्ये काही इंटरेस्ट नव्हता. आता मला संघटनेत कोणतही पद द्या मी त्या पदाला न्याय देईल, असे अजित पवार म्हणाले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.