Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

शेडगेवाडीजवळ ट्रॅव्हल्सला आग : लाखो रुपयांचे नुकसान

शेडगेवाडीजवळ ट्रॅव्हल्सला आग : लाखो रुपयांचे नुकसान



सांगली : खरा पंचनामा

रत्नागिरी जिल्ह्यातील हातखंबाहून पुण्याला नेपाळी कामगारांना घेउन निघालेल्या ट्रॅव्हल्सला कराड-शेडगेवाडी रस्त्यावरील मांगिरी खिंडीत आग लागली. गुरुवारी पहाटे ही घटना घडली. यामध्ये जीवित हानी झाली नाही मात्र लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास ट्रॅव्हल्स (एमपी ४९ एमएम २७२७) शिराळा तालुक्यातील कराड - शेडगेवाडी राज्य मार्गवरील मांगिरी खिंडित आली असता बसला चढण चढत नसल्याने गाडी मधील निम्मे प्रवाशी खाली उतरल्या नंतर शंभर मिटर पुढे घाट चढून गेल्यानंतर बसने अचानक पेट घेतला. यामुळे बसमध्ये असलेले अन्य प्रवासी खाली उतरून आरडा ओरड करु लागले. 

बसला अचानक आग लागल्याने चालकही बस थांबवून खाली उतरला. पहाता पहाता बसला आगीने वेढले. या आगीत बस जळून खाक झाली. आगीमध्ये बससोबत प्रवाशांचे साहित्यही जळून खाक झाले. काही कामगारांनी गावी जात असताना रोख रक्कमही सोबत घेतली होती. कपडे, आंबे व अन्य साहित्यही या आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. यात लाखो रूपयांचे नुकसान झाले. या आगीची माहिती कराड अग्निशमक दलास कळविल्यानंतर पहाटे सव्वा पाच वाजता आग विझवण्यात आली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.