Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कर्नाळमध्ये बिबट्या सदृश प्राण्याच्या दर्शनाने घबराट!

कर्नाळमध्ये बिबट्या सदृश प्राण्याच्या दर्शनाने घबराट!



सांगली : खरा पंचनामा

मिरज तालुक्यातील कर्नाळ येथे सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास बिबट्या सदृश प्राण्याचे दर्शन झाल्याने ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. या प्राण्याचे दर्शन झाल्यानंतर ग्रामस्थांनी वनविभाग आणि पोलिसांशी संपर्क साधल्याचे सांगण्यात आले.

कर्नाळ येथे हायस्कूल परिसरात शेवाळे मळा आहे. सोमवारी रात्री या मळ्यातील काही लोकांना बिबट्या सदृश प्राण्याचे दर्शन झाले. त्यानंतर तेथील लोकांनी घाबरून पोलिस आणि वनविभागाला माहिती दिली. रात्र असल्याने तसेच पाऊस पडल्याने रात्री उशिरापर्यंत नेमका काय प्रकार होता हे समजू शकले नाही.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.