महिलेने चक्क बिबट्याचे कान ओढुन त्याला फटकावले!
छत्रपती संभाजीनगर : खरा पंचनामा
जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेने चक्क बिबट्याचे कान ओढून त्याला चांगलेच फटकावले. गोठ्यातील बकऱ्यांवर बिबट्याने हल्ला केल्यानंतर महिलेने थेट बिबट्याशी झुंज दिली. या घटनेत महिला थोडक्यात वाचली आहे.
मात्र, यात एका बकरीचा मृत्यू झाला आहे. गंगापूर तालुक्यातील भिवधानोरा शिवारात मधुकर लांडे यांच्या शेतवस्तीवर रात्री साडेआठच्या सुमारास बकऱ्यांच्या गोठयात बिबट्या शिरला. बिबट्याला पाहाताच बकऱ्यांनी आरडाओरड सुरू केली. बकऱ्यांचा आवाज बाजूलाच राहत असलेल्या महिलेला ऐकू गेला.
तिने शेडमध्ये जाऊन दोन्ही बकऱ्याचे भांडण चालू असल्याचे समजून बिबट्याला ढकलण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याचा कान धरून त्याच्या डोक्यावरही चापटा मारल्या. महिलेचा आणि बिबट्याचा सर्व खेळ दोन ते तीन मिनिट सुरू होता. बिबट्या शिकारीत मग्न असल्यामुळे बिबट्याने महिलेकडे दुर्लक्ष केलं.
शिकार झाल्यानंतर महिलेला जेव्हा बिबट्या असल्याचे लक्षात आले त्यानंतर महिलेने आरडाओरड केली. महिलेचा आवाज ऐकून बिबट्याने तिथून धूम ठोकली. तोपर्यंत बिबट्याने एका बकरीची शिकार केली होती. या घटनेने महिलेचा चांगलाच थरकाप उडाला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.