रायगडावर हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत शिवराज्याभिषेक सोहळा!
रायगड : खरा पंचनामा
किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आज राज्यभरात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रायगडावर संभाजीराजे छत्रपती यांच्याहस्ते विधिवत पूजा करण्यात आली. रायगडावर राज्यभरासह कर्नाटक, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, गुजरात येथून हजारो शिवभक्त आले होते.
मंगळवारी पहाटेच्या प्रहारात जल्लोष नवक्रांतीचा, जल्लोष स्वाभिमानाच्या ललकारीने व शिवगर्जनेने किल्ले रायगड दुमदुमला. सांगली व सोलापूरमधील हलगी वादकांनी वादन करत गडावरील शिवभक्तांमध्ये नवचैतन्य निर्माण केले. वयोवृद्ध आजीने देखील यावेळी हलगीवर ठेका धरला होता. सोमवारीच राज्यातील ४० आखाडे मर्दानी खेळ दाखविण्यासाठी गडावर दाखल झाले होते. अनेक शाहीरांनी शिवकाल समोर उभा केला.
मर्दानी खेळांच्या माध्यमातून राज्यातील पारंपारीक खेळाचे महत्व पटवून दिले जात होते. महिलांना स्वरक्षण कसे करायचे याचेही धडे दिले जात होते. शिरकाई मातेचा उत्सव गोंधळाला शिवभक्तांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.
गडावरील होळीचा माळासह, गडाच्या इतर भागांत शिवभक्तांनी भेटी देत किल्ले रायगडाची मोहीम फत्ते केली.
सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, जळगाव, पैठण, अहमदनगर, औरंगाबाद, मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड यासह राज्यातील अनेक ठिकाणांहून शिवभक्त गडावर दाखल झाले होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.