Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

रिलायन्स ज्वेल्स दरोडा : ती दुचाकी अद्याप मिळालीच नाही!

रिलायन्स ज्वेल्स दरोडा : ती दुचाकी अद्याप मिळालीच नाही! 



सांगली : खरा पंचनामा 

सांगलीत भरदिवसा रिलायन्स ज्वेल्सवर धाडसी दरोडा टाकण्यात आला होता. यामध्ये साडेसहा कोटींचे दागिने, हिरे चोरीला गेले आहेत. चोरट्यांनी गुन्ह्यात वापरलेली टाटा सफारी गाडी, एक दुचाकी जप्त केली आहे. मात्र या गुन्ह्यात वापरलेली आणखी एक दुचाकी पोलिसांना अद्याप सापडली नाही. या गुन्ह्याच्या तपासात बरीच प्रगती झाली असली तरी पोलिस अद्याप चोरांपर्यंत पोहोचू शकले नाहीत. 

शहरातील मध्यवर्ती तसेच वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या रिलायन्स ज्वेल्स या शोरूमवर 8 जणांनी सशस्त्र दरोडा टाकला. पोलिस असल्याची बतावणी करत या शोरूममधील कोट्यवधी रुपयांचे दागिने, हिरे, रोकड लंपास करण्यात आली. यावेळी पळून जाणाऱ्या ग्राहकाच्या दिशेने गोळीबारही करण्यात आला. त्यात तो ग्राहक पडल्याने जखमी झाला. 

ही घटना घडल्यानंतर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या सूचनेनुसार तातडीने तपास सुरू करण्यात आला. तांत्रिक मुद्दे तसेच सीसीटीव्ही फुटेज याद्वारे तपासाला गती देण्यात आली. घटनेदिवशी पोलिसांना मिरज बायपास रस्त्याकडेला एक पल्सर दुचाकी बेवारस स्थितीत सापडली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी भोसे येथे सफारी गाडीही सापडली. या गाडीत चोरट्यांनी त्यांचे कपडे, बूट, गावठी कट्टे असा मुद्देमाल सापडला. 

मात्र चोरट्यांनी या गुन्ह्यात आणखी एक दुचाकी वापरल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. त्या दुचाकीचा युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे. ती दुचाकी सापडल्यास पोलिसांना आणखी काही दुवे मिळण्याची शक्यता आहे.


कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.