महाराष्ट्रातील इंजेक्शनचा मोठा घोटाळा उघड : दोघाना अटक
नागपूर : खरा पंचनामा
नागपूर येथील एम्समधील एक धककादायक प्रकार समोर आला आहे. या हॉस्पिटलमध्ये इंजेक्शन घोटाळा समोर आला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. महाराष्ट्रातील हा एक मोठा घोटाळा असल्याची चर्चा आहे.
नागपूरच्या एम्स रुग्णालयात इंजेक्शन खरेदीमध्ये मोठी हेराफेरी केली जात होती. पैसे इंजेक्शनचे ग्राहकांना द्यायला लावायचे आणि पुन्हा तीच इंजेक्शन दुकानात नेऊन ठेवायचे. ग्राहकांकडून ज्यादाचे इंजेक्शन किंवा तीन इंजेक्शन खरेदी करायला सांगायचे. हा सगळा प्रकार एमआरआय करणाऱ्यांनी समोर आणला.
एमआरआय करण्यासाठी तीन रुग्ण गेले. त्यावेळी तिघांनाही एक एक इंजेक्शन खरेदी करायला सांगितले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे तीन इंजेक्शन खरेदी केली. पैसेही दिले आणि रुग्णालयात आले. त्यानंतर त्यांच्याकडून हे इंजेक्शन घेतली मात्र दोन इंजेक्शन न फोडता परत दुकानात विक्रीसाठी ठेवण्यात आले. तर एकच इंजेक्शन तीन रुग्णांना देण्यात आले. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. दरम्यान, दलालांच्या माध्यमातून हे इंजेक्शने परत खरेदी केले जायचे अशी माहिती समोर आली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.