Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कुस्तीपटूंनी घेतली गृहमंत्री शाह यांची भेट : दोन तास चर्चा

कुस्तीपटूंनी घेतली गृहमंत्री शाह यांची भेट : दोन तास चर्चा



दिल्ली : खरा पंचनामा

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात कुस्तीपटूंनी आंदोलन पुकारले आहे. या कुस्तीपटूंनी आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या बैठकीत सुमारे दोन तास चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.

या बैठकीत काय घडले याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. बृजभूषण सिंह यांच्यावर ५ दिवसात कारवाई करावी असा इशारा कुस्तीपटूंनी दिला होता. अमित शहा आणि कुस्तीपटूंची या बैठकीत बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि काही प्रशिक्षकसुद्धा उपस्थित होते.

बजरंग पुनियाने सांगितलं की, "गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. यावर मी जास्त बोलू शकत नाही." बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विनेश फोगाट हे बृजभूषण यांच्याविरोधात आंदोलनात सर्वात पुढे आहेत. अल्पवयीन मुलीसह सात महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. दिल्ली पोलिसांनी २८ एप्रिल रोजी बृजभूषण सिंह यांच्याविरोधात एफआयआर दाखल केली होती.

एफआयआरमध्ये १५ लैंगिक शोषणाच्या तक्रारी दाखल केल्या आहेत. यात १० प्रकरणात मर्जीविरुद्ध चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप आहे. यात पाठलाग करणं आणि धमकी दिल्याच्या तक्रारीचाही समावेश आहे. चार राज्यातील १२५ संभाव्य साक्षीदारांचे जबाब दिल्ली पोलिसांनी नोंदवल्याचंही म्हटलं जात आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.