वरळीला गेले नाहीत ते मोदींना मणिपूरला जायला सांगतात!
मुंबई : खरा पंचनामा
पंतप्रधान नरेंद्र मोदींना अमेरिकेला जायला वेळ आहे, मात्र मणिपूर जळतंय तिकडे जायला वेळ नाही असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी १९ जून च्या भाषणात केलं होतं. तसंच मोदींनी लस तयार केली हे फडणवीसांचं वाक्य दाखवत त्यांची खिल्ली उडवली होती. या सगळ्याचा आज देवेंद्र फडणवीस यांनी समाचार घेतला. मातोश्रीपासून वरळीपर्यंत जे गेले नाहीत ते मोदींना मणिपूरला जा हे कोणत्या अधिकारात सांगत आहेत? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे.
फडणवीस म्हणाले, विकास करताना गरीब कल्याणाचा अजेंडा मोदींनी राबवला. त्यामुळेच आपण पाहतोय मोदीजी अमेरिकेला गेले तर महाराष्ट्रातले एक नेते म्हणाले की आमचे विश्वगुरु अमेरिकेला चाललेत त्यांना मणिपूरला जायला वेळ नाही. मी त्यांना एवढंच सांगू इच्छितो की मणिपूर सांभाळायला आमचे गृहमंत्री अमित शाह पुरेसे आहेत. तुम्ही मातोश्रीपासून वरळीपर्यंतही गेला नाहीत इकडे मोदीजींना सांगता अमेरिकेला न जाता मणिपूरला जा. हे सांगण्याचा तुम्हाला अधिकार आहे का? असा माझा त्यांना सवाल आहे.'
मोदीजींनी कोव्हिडची प्रतिबंधात्मक लस तयार केली. परवा मी म्हटलं कोव्हिडची लस मोदींनी तयार केली तर उद्धव ठाकरेंना खूपच झोंबलं. ते म्हणाले की लस काय मोदी तयार करतात का? मग उद्धव ठाकरे रोज सांगायचे मी राज्य चालवतो म्हणजे काय ते घोड्यावर किंवा रथावर बसून हाकत होते का? की बैलबंडी हाकत होते? मी तर म्हणेन होय मोदींनीच लस तयार केली. याचं कारण असं आहे जगातल्या पाच देशानींच लसी तयार केल्या. या लसींचं जे रॉ मटेरिअल होतं ते दोन ते तीन देशांकडेच होतं. दुसऱ्या देशांना ते मिळत नव्हतं. मात्र मोदींचे जे चांगले संबंध इतर देशांशी आहेत त्यामुळे ते आपल्याला मिळालं. ते स्वतः त्या शास्त्रज्ञांकडे गेले मोदीजींनी त्यांना १८०० कोटी रुपये दिले आणि लस तयार करुन घेतली, असेही फडणवीस म्हणाले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.