सांगलीत लायसन्ससाठी जुलैमध्ये तालुकानिहाय शिबिरांचे आयोजन
सांगली : खरा पंचनामा
ग्रामीण भागातील वाहनधारकांना शिकाऊ आणि पक्के लायसन्स सहज उपलब्ध व्हावे यासाठी सांगली आरटीओ कार्यालयाने जुलै महिन्यात तालुकानिहाय शिबिरांचे आयोजन केले आहे. या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांतराव साळी यांनी केले आहे.
इस्लामपूर येथे दि. 3 आणि 17 जुलै रोजी हे शिबिर होणार आहे. विट्यात 4 आणि 25, कडेगाव येथे 11 आणि 31 तर पलूस येथे दि. 6 आणि 28 जुलै रोजी हे शिबिर होईल. आष्टा येथे दि. 10, 24 जुलै रोजी हे शिबिर होणार आहे.
आटपाडी येथे दि. 18, जतमध्ये 5 आणि 19, शिराळा येथे दि. 13 आणि 27 रोजी तर तासगावात 12 आणि 26 तसेच कवठेमहांकाळ येथे दि. 20 जुलै रोजी हे शिबिर होणार असल्याची माहिती श्री. साळी यांनी दिली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.