अल्पवयीन मुलीचा विनयभंग, तरूणास २ वर्षाची शिक्षा
सांगली : खरा पंचनामा
तासगाव येथील बसस्थानक परिसरात अल्पवयीन मुलीचा अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या तरूणास दोन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच दहा हजार रूपये दंड तो न भरल्यास दोन महिन्यांची सश्रम कारावासाचीही शिक्षा सुनावण्यात आली. २०१९ मध्ये ही घटना घडली होती. जिल्हा व जादा सत्र न्यायाधीश डी. एस. हातरोटे यांनी सोमवारी हा निकाल दिला. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील आरती देशपांडे-साटविलकर यांनी काम पाहिले.
राहुल गुलाब जाधव (वय २८, रा. पुणदी, ता. तासगाव) असे शिक्षा झालेल्या तरूणाचे नाव आहे. राहुल जाधव याने २०१९ मध्ये पीडित मुलगी अल्पवयीन आहे याची माहिती असूनही तासगाव बसस्थानक परिसरात तिचा पाठलाग करून तिला गाठले. त्यावेळी त्याने तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. त्यानंतर पीडितेच्या तक्रारीनुसार तासगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक यु. एम. दंडिले यांनी करून जाधव याच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. या खटल्याच्या सुनावणीवेळी सहाजणांची साक्ष नोंदवण्यात आली. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद झाल्यानंतर न्या. हातरोटे यांनी जाधव याला दोन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.