Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

काँग्रेसने भाकरी फिरवली : मुंबई प्रदेशच्या अध्यक्षपदी वर्षा गायकवाड गुजरात, पुद्दुचेरीतही बदल

काँग्रेसने भाकरी फिरवली : मुंबई प्रदेशच्या अध्यक्षपदी वर्षा गायकवाड
गुजरात, पुद्दुचेरीतही बदल



नवी दिल्ली : खरा पंचनामा

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस ॲक्शन मोडवर आलं असून काँग्रेस हायकमांडने मुंबई, गुजरात आणि पद्दुचेरी काँग्रेसमध्ये मोठे बदल केले आहेत. यामध्ये मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांना अध्यक्षपदावरून हटवण्यात आलं आहे. तर त्यांच्या जागी आता वर्षा गायकवाड यांची मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.


आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने मुंबई काँग्रेसमध्ये हा बदल केला असल्याची चर्चा आहे. याबरोबरच गुजरात आणि पद्दुचेरीमध्येही मोठे बदल करण्यात आले आहेत.

गुजरात काँग्रेसच्या अध्यक्षपदी आता खासदार शक्तिसिंह गोहिल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर काँग्रेस नेते दीपक बावरिया यांना दिल्ली काँग्रेस आणि हरियाणा काँग्रेसचे प्रभारी करण्यात आले आहे.

याबरोबरच पद्दुचेरीच्या प्रदेशाध्यक्षपदी खासदार व्ही.वैथीलिंगम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी जगदीश ठाकोर हे गुजरात काँग्रेसचे अध्यक्ष तर पुद्दुचेरी काँग्रेसचे अध्यक्ष एव्ही सुब्रमण्यम हे जबाबदारी सांभाळत होते. याबाबतच्या माहितीचे पत्र काँग्रेस महासचिव के.सी. वेणुगोपाल यांनी जारी केले आहे.

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने हे फेरबदल केले असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे काँग्रेसने आता आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने मोठ्या हालचाली सुरू केल्या असल्याचं बोललं जात आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.