राजारामबापू सहकारी बॅंक संचालक मंडळ निवडणूक बिनविरोध!
सांगली : खरा पंचनामा
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणाऱ्या राजारामबापू सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली आहे. मंगळवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी १९ जागेसाठी १९ अर्ज शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे निकाल जाहीर करण्याची केवळ औपचारिकता राहिली आहे.
नव्या संचालक मंडळात ६ नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उर्मिला राजमाने यांनी काम पाहिले.
सर्व साधारण गटातून शामराव ज्ञानदेव पाटील इस्लामपूर, संजय जयसिंग पाटील नेर्ले, माणिक शामराव पाटील बोरगांव, विजय विठ्ठलराव यादव बावची, डॉ. प्रकाश हिंदुराव पाटील येडेनिपाणी, जयकर बाबुराव गावडे वाळवा, धनाजी आनंदराव पाटील जुनेखेड, अनिल हणमंत गायकवाड मिरजवाडी, नामदेव तुकाराम मोहिते महादेव वाडी, संभाजी आनंदराव पाटील मालेवाडी, प्रशांत बाळासो पाटील वशी, अशोक रघुनाथ पाटील ऐतवडे खुर्द, राजेश शंकरराव पाटील कापुसखेड, सुरेश बाळकृष्ण ढवळी यांचेच अर्ज राहिले आहेत.
महिला राखीव गटातून सुस्मिता सुरेश जाधव पाटील नरसिंहपूर, कमल राजेंद्र पाटील इस्लामपूर, इतर मागासवर्गीय गटातून शहाजी संभाजी माळी कासेगांव, अनुसुचित जाती- जमाती गटातून सुभाषराव यशवंत सुर्यवंशी इस्लामपूर, भटक्या-विमुक्त जाती गटातूनआनंदा पिराजी लकेसर दुधारी यांचेच उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली आहे.
राजारामबापू बँकेने गेल्या ४२ वर्षात पारदर्शी आणि काटकसरीचा कारभार करीत राज्यात नावलौकिक मिळविला आहे. बँकेकडे २२७० कोटीच्या ठेवी असून १५५० कोटींची कर्जे दिली आहेत. बँकेचा एकूण व्यवसाय ३८२० कोटींचा आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.