Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कवठेमहांकाळ तालुक्यातील तीन तरुणांना अटक नालसाब मुल्ला खून प्रकरण

कवठेमहांकाळ तालुक्यातील तीन तरुणांना अटक
नालसाब मुल्ला खून प्रकरण



सांगली : खरा पंचनामा

राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, रेकॉर्डवरील गुन्हेगार नालसाब मुल्ला याच्या खून प्रकरणी कवठेमहांकाळ तालुक्यातील आणखी 3 तरुणांना बुधवारी रात्री अटक करण्यात आली आहे. त्यांना 2 दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान सचिन विजय डोंगरे (रा. गुलाब कॉलनी, सांगली) यानेच गुन्हयाचा कट रचला असल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

रोहीत अंकुश मंडले (रा. खरशिंग ता. कवठेमहांकाळ), प्रशांत उर्फ बबलु संभाजी चव्हाण (रा. खरशिंग ता. कवठेमहांकाळ), ऋत्विक बुध्द माने (रा. कोकळे ता. कवठेमहांकाळ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी यापूर्वी
सनी सुनिल कुरणे (रा. हॅप्पी स्पॉट, शाहुनगर, जयसिंगपुर), विशाल सुरेश कोळपे (रा. लिंबेवाडी, रांजणी ता. कवठेमहांकाळ), स्वप्निल संतोष मलमे (रा. खरशिंग ता. कवठेमहांकाळ) यांना अटक करण्यात आली आहे. एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय मोरे करत आहेत.

पोलीस अधिक्षक डॉ. बसवराज तेली,  उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विश्रामबागचे निरीक्षक संजय मोरे, कवठेमहांकाळचे निरीक्षक जितेंद्र शहाणे, सहायक निरीक्षक अमितकुमार पाटील, संकेत कानडे, आर्यन देशिंगकर, संदिप घस्ते, प्रशांत माळी, शिवाजी टोकल आदींनी ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.