Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राज्यातील ३० लाख दस्तांची होणार फेरतपासणी! महसूलमंत्र्यांचा आदेश, कोणत्या शहरांतील दस्त तपासणार?

राज्यातील ३० लाख दस्तांची होणार फेरतपासणी!
महसूलमंत्र्यांचा आदेश, कोणत्या शहरांतील दस्त तपासणार? 



मुंबई : खरा पंचनामा

तुकडेबंदी, ‘महारेरा’च्या नियमांचे उल्लंघन झाल्याच्या तक्रारीवरून आता राज्यातील २०२० ते २२ या तीन वर्षांतील पुण्यासह मुंबई, ठाणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, परभणी, लातूर येथील सुमारे ३० लाख दस्तांच्या फेरतपासणीचे आदेश महसूलमंत्र्यांनी दिले आहेत. त्यामुळे राज्यातील नोंदणी मुद्रांक विभाग कामाला लागला आहे. 

यासाठी पथकांची नियुक्ती करण्यात आली असून, खरेदी खत, बक्षीसपत्रे यासारख्या जमीन हस्तांतरणाच्या दस्तांचीही फेरतपासणी केली जाणार आहे. त्यानंतर किती दस्त बेकायदा आहेत हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

महाराष्ट्र नोंदणी अधिनियम कलम ४४ आय या कलमांचे; तसेच जमीन अकृषक (एनए) असल्याचे आदेश दाखल न करणे, एक ते दोन गुंठ्यांच्या जमिनीचे खरेदी खत करता येत नसतानाही तुकडेबंदी, ‘महारेरा’ कायद्यांचे उल्लंघन केलेल्या दस्तांची फेरतपासणी करण्यात येणार आहे. 

अशा प्रकारच्या २०२० ते २२ या तीन वर्षांतील दस्तांची फेरतपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या तपासण्या आता नोंदणी उपमहानिरीक्षकांसह सह जिल्हा निबंधकांच्या पातळीवर स्वतंत्रपणे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तीन वर्षांत जमीन हस्तांतरण झालेले; तसेच खरेदीखत, बक्षीसपत्रे यांसारखी प्रकरणे तपासली जाणार आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.