Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कोल्हापूर विमानतळाला राजाराम महाराजांचे नाव देण्याचा प्रस्ताव

कोल्हापूर विमानतळाला राजाराम महाराजांचे नाव देण्याचा प्रस्ताव



कोल्हापूर : खरा पंचनामा

कोल्हापूर येथील विमानतळाला छत्रपती राजाराम महाराज यांचे नाव देण्याचा प्रस्ताव लवकरच केंद्रीय मंत्रीमंडळासमोर मांडण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. शिंदे शनिवारपासून कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. परंतू ओरिसामध्ये झालेल्या दुर्घटनेमुळे कोल्हापूरचे शनिवारचे सर्व जाहीर कार्यक्रम त्यांनी रद्द केले होते. रविवारचे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील कार्यक्रम त्यांनी केले. आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली. 

शिंदे म्हणाले, कालच मी कोल्हापूर विमानतळाच्या नवीन टर्मिनस इमारतीच्या कामाची पाहणी केली. दिवाळीपर्यंत काम पूर्ण करण्याच्या सुचना दिल्या आहेत. राजाराम महाराजांचे नाव देण्याबाबत विचारणा केल्यानंतर ते म्हणाले, महाराष्ट्र शासनाकडून याबाबत प्रस्ताव माझ्या कार्यालयाकडे आला आहे. आमच्या कार्यालयाकडून तो मंजूर करून आता केंद्रीय मंत्रीमंडळासमोर आणण्यात येणार आहे. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर पुढची प्रक्रिया करण्यात येईल.

ते म्हणाले, गेल्या नऊ वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये क्रांतीकारी परिवर्तन झाले आहे. प्रत्येक क्षेत्रात भारत अव्वल होत असून प्रगतीचे आकडे थक्क करणारे आहेत. सामाजिक आणि वैयक्तिक लाभाच्या योजना प्रभावीपणे राबवून भारत हा जगातील एक नक्षत्र बनला आहे. २०१४ च्या आधी ६८ वर्षात देशात एकूण विमानतळ ७४ होती. केवळ ९ वर्षात आणखी ७४ विमानतळे झाली असून ही संख्या २२० पर्यंत नेण्यात येणार आहे. पूर्वी प्रतिदिन १३ किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग बनवला जात होता. आता त्याच्या तिप्पट म्हणजे ३६ किलोमीटर प्रतिदिन महामार्ग बनवला जात आहे, असेही शिंदे म्हणाले.

यावेळी खासदार धनंजय महाडिक, खासदार अपराजिता सारंगी, महानगर जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, महिला जिल्हाध्यक्ष शौमिका महाडिक उपस्थित होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.