निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न!
मुंबई : खरा पंचनामा
कोल्हापूरमध्ये जो राडा झाला, त्यासाठी कोण जबाबदार आहे याचा सरकारने शोध घेतला पाहिजे. त्याचा लवकरात लवकर छडा लावावा. निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे.
एका आक्षेपार्ह स्टेट्सवरून कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या. या हिंदुत्ववादी संघटनांनी आज कोल्हापूर बंदची हाक दिली. त्यानंतर प्रचंड मोठा मोर्चा काढला. जमावबंदीचे आदेश झुगारून हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी हजारो लोक मोर्चात सहभागी झाले होते. हा मोर्चा सुरू असतानाच आंदोलकांना पोलिसांनी पांगवण्याचा प्रयत्न केला. मात्र, हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक झाल्याने पोलिसांनी अखेर या मोर्चावर लाठीमार केला. पोलिसांच्या लाठीमारामुळे एकच गोंधळ उडाला.
या सर्व पार्श्वभूमीवर अजित पवार आज माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी या राड्यामागे नेमका कोणाचा आहात आहे, काय हेतू आहे याचा सरकारने लवकरात लवकर शोध लावावा, अशी मागणी केली. अफवा पसरवून दंगल घडवण्याचा घाट घातला जात आहे असा आरोपही त्यांनी केला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.