Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीतील प्रत्येक सराफी दुकानास पोलिस भेट देतील पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांची ग्वाही

सांगलीतील प्रत्येक सराफी दुकानास पोलिस भेट देतील
पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांची ग्वाही



सांगली : खरा पंचनामा

सांगलीतील सराफ पेठेत नवीन पोलिस चौकीबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा करुन प्रस्ताव मंजुर करुन घेवु. पोलीस गस्त वाढवुन प्रत्येक सराफ व्यवसायक यांचे दुकानास भेट देवुन रजिस्टर ठेवण्यात येईल असे आश्वासन सांगली शहरचे पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी दिले.

विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीतील सर्व सराफी व्यवसायक, व्यवस्थापक यांची बैठक विश्रामबाग पोलीस ठाण्यात घेण्यात आली. त्यावेळी जाधव यांनी ही ग्वाही दिली. नुकताच झालेला रिलायन्स ज्वेल्स दुकानमधील दरोडा तसेच इतर होणाऱ्या चोरीचे अनुषंगाने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी जाधव यांनी सराफ व्यवसायिकांच्या अडीअडचणी बाबत सविस्तर चर्चा केली. व्यावसायिकांनी नवीन पोलीस चौकी असावी याबाबत मागणी केली तसेच पोलीस बंदोबस्तामध्ये वाढ करावी असे सांगितले. 

यावेळी विश्रामबागचे पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी दुकानामधील कामगार वर्ग, मॅनेजर यांना अलार्म सिस्टीम तसेच आपत्कालीन प्रशिक्षण, तसेच सुरक्षा रक्षक, विश्रामबाग पोलीस ठाणे तसेच कंट्रोल रुम यांच्याशी तात्काळ संपर्क कसा करावा याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच त्यांना सुरक्षेच्या अनुषंगाने लेखी नोटीस देण्यात आली. यावेळी २० दुकानदार उपस्थित होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.