माध्यमांचे लोक, कायद्याचे रक्षक आणि राजकीय कार्यकर्ते होते 'साब'चे लाभार्थी!
सांगली : खरा पंचनामा
रेकॉर्डवरील गुन्हेगाराला सामाजिक कार्यकर्त्याचे लेबल चिटकवण्याचा केविलवाणा प्रयत्न सध्या सुरू आहे. सांगलीचा 'बाबा' व्हायला निघालेल्या 'साब'चे अनेकांशी घनिष्ठ संबंध होते. त्यामध्ये माध्यमातील लोक, कायद्याचे रक्षक आणि राजकीय लोकांचाही समावेश आहे. त्यामुळेच काल अनेकांनी 'साब'चे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला. आता यामध्ये या सर्व लाभार्थ्यांची चौकशी होणार का? आणि कारवाई होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सांगलीचा 'बाबा' बनायला निघालेला हा साब किरकोळ व्यवहारातून सावकार बनला. त्याने त्यावेळी विरोधी पक्षात असलेल्या एका नेत्याचा 'नीट' हात धरला. त्यावेळी विरोधी पक्षातील लोकांना खूप किंमत होती. विरोधी पक्षात असतानाही त्यांची कामे बिनबोभाटपणे होत होती. त्याचाच फायदा घेत 'साब'ने अनेकांना पोस्टिंग मिळवून दिल्या. त्यानंतर या साबचा दरारा चांगलाच वाढला.
दरारा वाढल्यानंतर साबने त्याचे धंदे वाढवले आणि हातपाय पसरले. त्याचवेळी त्याने कायद्याचे रक्षण करणाऱ्यांना लाभ देण्यास सुरुवात केली. त्याचे कारनामे प्रसिद्ध होऊ नयेत म्हणून माध्यमांच्या लोकांना बिदागी सुरू केली. शिवाय विरोधातील, सत्ताधारी पक्षातील उचापती लोकांनाही लाभ देण्यास सुरुवात केली. काल अखेरपर्यंत या लाभार्थ्यांनी त्याच्याकडून वेळोवेळी लाभ घेतले. म्हणूनच त्याला एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून प्रसिद्ध करण्याची धडपड सुरू होती.
आता सांगलीतील डॉक्टरनी या लाभार्थ्यांची यादी मिळवून त्यांच्याकडे चौकशी केली तर अनेक धक्कादायक बाबी उघडकीस येण्याची शक्यता आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.