Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

तपास अधिकारी, बचाव पक्षाच्या वकिलांमध्ये खडाजंगी! अनिकेत कोथळे खून प्रकरण सुनावणी

तपास अधिकारी, बचाव पक्षाच्या वकिलांमध्ये खडाजंगी!
अनिकेत कोथळे खून प्रकरण सुनावणी



सांगली : खरा पंचनामा

अनिकेत कोथळे खून प्रकरणाची सोमवारपासून सुनावणी सुरू झाली आहे. यावेळी तपास अधिकारी मुकुंद कुलकर्णी यांनी अनिकेतचा डीएनए अहवाल न्यायालयात सादर केला. दरम्यान उलट तपासणीवेळी बचाव पक्षाचे वकील  विकास पाटील-शिरगावकर तसेच विशेष सरकारी वकील उज्वल निकम आणि तपास अधिकारी मुकुंद कुलकर्णी यांच्यात जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली.

अनिकेत कोथळे खून प्रकरणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश मलाबादे यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी तपास अधिकारी मुकुंद कुलकर्णी यांचा सरतपास नोंदवला. खुनातील संशयितांनी ज्या गाडीतून अनिकेतचा मृतदेह नेला त्या कारचे (एम. एच. १० सी एन ०८३२) कोगनोळी टोलनाक्यावरील ताब्यात घेतलेले सीसीटीव्ही फुटेज न्यायालयास सादर केले. मिरजेच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून हीस्टो पॅथॉलॉजी तसेच एनोटॉमीचा अहवाल सुद्धा न्यायालयात सादर करण्यात आला.

खून प्रकरणाचा तपास करताना तपास अधिकारी कुलकर्णी यांनी ज्या महत्त्वाच्या साक्षीदारांचे जबाब नोंदवले होते त्याबाबतची माहिती त्यांनी न्यायालयास दिली. अनिकेतच्या खूनादरम्यान तसेच त्यानंतर ज्या काही घडामोडी घडल्या त्या दरम्यानच्या कालावधीतील आरोपींचे मोबाईल संभाषण त्या अनुषंगाने असलेली सर्व माहिती न्यायालयास दिली. अनिकेतचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला त्या आंबोली येथील घटनास्थळाचा त्याचप्रमाणे सांगली येथील घटनास्थळाचा नकाशा तसेच वैद्यकीय अहवाल न्यायालयास सादर केला. 

दुपारच्या सत्रात बचाव पक्षाचे वकील  विकास पाटील-शिरगावकर यांनी तपास अधिकारी कुलकर्णी यांचा उलट तपास नोंदवण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांनी कुलकर्णी यांना विचारलेल्या प्रश्नांवरून विशेष सरकारी वकील उज्वल निकम, तपास अधिकारी मुकुंद कुलकर्णी आणि बचाव पक्षाचे वकील शिरगावकर यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. दरम्यान सुनावणी अपूर्ण राहिल्याने आज मंगळवारी पुन्हा सुनावणी होणार आहे.  

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.