Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

नाहीतर एकेकाच्या कानाखाली आवाज काढेन!

नाहीतर एकेकाच्या कानाखाली आवाज काढेन! 



पुणे : खरा पंचनामा 

प्रत्येकाने काम करायचं आहे. मूळशीच्या लोकांना पदं दिली आहेत. भांडायचं नाही. नाही तर एकएकाच्या कानाखालीच आवाज काढेनं. यातून तुमची बदनामी होत नाही. बदनामी आमची होते. पवार साहेबांची होते. हा कोणता फाजिलपणा चाललाय? पदाचा राजीनामा घेईल हां. मी टोकाचा वागेन मग, असा सख्त इशाराच अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांना दिला. पुण्यात लोकसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. 

ते म्हणाले, एकदा पदाधिकारी झाल्यानंतर तुमच्याकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलतो. तुम्ही राष्ट्रवादीचे पदाधिकारी असता. पण ही कोणती पद्धत आहे? हे मी नवीनच बघत आहे, असं ते म्हणाले. पिंपरी चिंचवडच्या लोकांना बोलावलं नव्हतं का रे. पुण्यातून चांगली वाहन निघाली पाहिजे. चार चाकी हजार वाहनं मी ग्रामीण भागातील सांगितली आहे. शहरी भागातील नाही. शहरी भागातीलही दोन्ही शहरांची मिळून तेवढीच वाहन काढू शकतो. तेवढी ताकद आपली आहे. हडपसर विधानसभा आपल्यासोबत आहे. वडगावशेरी सोबत आहे. खडकवासला कमी मतांनी हरलो. इतर ठिकाणीही आपली ताकद आहे. 

त्यामुळे मी 8 तारखेला येतो. उद्या आणि परवा मी मुंबईत आहे. तोपर्यंत तुम्ही तयारी करा. आणि 8 तारखेला मला कुठपर्यंत तयारी झाली ते दाखवा. किंवा मी व्हिसीवर तुमच्याशी साधू शकतो, असं त्यांनी सांगितलं. आपली सर्व मदार पुणे जिल्हा, पुणे शहर, पिंपरी चिंचवडवर आहे. त्यादृष्टीने नियोजन करा. गाडीच्या मालकाने इतरांनाही सोबत घेऊन यायला पाहिजे. एकटं येऊ नका. पाच ते दहा सीटांची गाडी असेल तर तेवढी माणसं घेऊन या. वाहने कामी आणू नका, असंही त्यांनी कार्यकर्त्यांना बजावलं.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.