Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

आम्ही त्या हितचिंतकांच्या शोधात!

आम्ही त्या हितचिंतकांच्या शोधात!



मुंबई : खरा पंचनामा

'राष्ट्रात मोदी आणि राज्यात शिंदे' अशी जाहिरात काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध केली होती. यामध्ये एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदासाठी राज्यातील जनतेने सर्वाधिक पसंती दिल्याचे म्हटले आहे.

या जाहिरातीने भाजपमध्ये तीव्र नाराजीचे पडसाद उमटले. यासंबंधी बोलत असताना शिवसेनेचे नेते शंभूराज देसाई यांनी सांगितलं की, वर्तमानपत्रात छापून आलेल्या जाहिरातीशी शिवसेनेचा काहीही संबंध नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हितचिंतकांनी ही जाहिरात दिली असावी. या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळासह सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे.

यावरुन सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारला टोला लगावला आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "मी आणि दादाही हितचिंतक शोधत आहोत. राज्यातील सत्ताधारी पक्ष जाहिरातबाजीत व्यस्त आहे. नुसते तू तू मैं मैं सुरू आहे. महाराष्ट्रात काम थांबले आहे. "

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.