आषाढी एकादशी, ईदसाठी एकाच दिवशी सुट्टी!
मुंबई : खरा पंचनामा
शासनाकडून सन २०२३ या वर्षाकरिता जाहीर करण्यात आलेल्या सार्वजनिक सुट्ट्यांमधील 'बकरी ईद'ची सार्वजनिक सुट्टी २८ जून ऐवजी २९ जून रोजी जाहीर करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागानं याची घोषणा केली आहे. आषाढी एकादशी आणि बकरी ईदसाठी एकाच दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
शासनाकडून सन २०२३ या वर्षाकरिता जाहीर करण्यात आलेल्या सार्वजनिक सुट्ट्यांमधील 'बकरी ईद'ची सार्वजनिक सुट्टी बुधवार दि. २८ जून रोजी दर्शविण्यात आली होती. मात्र, हा सण गुरुवार, २९ जून रोजी येत असल्यानं २८ जूनची सुट्टी रद्द करुन २९ जून रोजी जाहीर करण्यात आली आहे, अशी अधिसूचना सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव सो. ना. बागुल यांनी काढली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.