गुंड म्हमद्या नदाफ 'येरवड्या'तून सांगलीत!
सांगली : खरा पंचनामा
मोकाअंतर्गत कारागृहात असलेला सांगलीतील नामचीन गुंड म्हमद्या नदाफ याला येरवडा कारागृहातून सांगलीतील मध्यवर्ती कारागृहात हलवण्यात आले आहे. न्यायालयातील सुनावणीसाठी त्याला सांगलीत आणल्याची चर्चा आहे.
म्हमद्यावर खून, खुनाचा प्रयत्न, गर्दी मारामारी, खंडणी यासह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. 2015 मध्ये त्याने त्याचाच पंटर असलेल्या मनोज माने याचा त्याच्या घरापासून काही अंतरावर निर्घृणपणे खून केला होता. त्यानंतर म्हमद्यासह या खुनातील संशयित आणि त्याच्या टोळीविरोधात मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. या गुन्ह्यात म्हमद्याला कर्नाटकातून अटक करण्यात आली होती.
कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी त्यावेळी सांगलीचे पोलिस अधीक्षक होते. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच म्हमद्याला पोलिस चमूने जीवाची बाजी लावून अटक केली होती. त्यावेळपासून म्हमद्या पुण्यातील येरवडा कारागृहात आहे.
दोन वर्षांपूर्वी म्हमद्यावर येरवडा कारागृहात जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. त्यात गंभीर जखमी होऊनही म्हमद्या त्यातून बचावला. आता न्यायालयातील सुनावणीसाठी त्याला सांगली जिल्हा मध्यवर्ती कारागृहात आणण्यात आले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.