Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

आयफोन मागितला म्हणून वडिलांनी घेतला भावी वकिलाचा जीव!

आयफोन मागितला म्हणून वडिलांनी घेतला भावी वकिलाचा जीव!



कोल्हापूर : खरा पंचनामा

कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यात गुरुवारी तरुणाचा खून करून मृतदेह रस्त्याकडेला टाकण्यात आला होता. त्याच्या खूनाचा छडा २४ तासांच्या आता लागला असून वडिलांनीच हा खून केल्याचे स्पष्ट झाले आहे.

उच्चशिक्षित मुलाचा मुलाच्या मदतीनेच वडिलांनी हा खून केला. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातल्या गोटखिंडी इथले दत्ताजीराव थोरात यांच्या मुलाचा मृतदेह आढळला होता. अमरसिंह थोरात असं खून झालेल्या तरुणाचं नाव होतं. तो दहा वर्षे पुण्यात एमपीएससीचा अभ्यासही करत होता. सध्या त्याने घरी अभ्यास सुरू केला होता. पण यश न आल्याने कोल्हापुरात वकिलीचे शिक्षणही घेत होता.

दरम्यान, अमरसिंह दारुच्या आहारी गेल्याने घरात वारंवार भांडणं होत होती. तर अमरसिंहने आयफोन घेण्यासाठी वडिलांकडे दीड लाखांची मागणी केली होती. यासाठी वडिलांना नकार देताच दोघांमध्ये वाद झाला. याच रागातून वडिलांनी घरात अमरसिंहच्या डोक्यात लोखंडी पाईप घातली. यामुळे प्रचंड रक्तस्राव होऊन अमरसिंहचा मृत्यू झाला. मुलाचा मृत्यू झाल्यानं त्यांनी मृतदेह रस्त्याशेजारीच टाकला होता. आता या प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला असून वडील दत्ताजीराव थोरात व भाऊ अभिजित थोरात यांना पोलिसांनी अटक केली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.