Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

ईडीच्या त्या अधिकाऱ्याच्या घरात सापडली बेहिशेबी मालमत्ता!

ईडीच्या त्या अधिकाऱ्याच्या घरात सापडली बेहिशेबी मालमत्ता!





मुंबई : खरा पंचनामा

भ्रष्टाचार आणि बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी ईडीचे तत्कालीन उपसंचालक आणि आयआरएस अधिकारी सचिन सावंत यांना बुधवारी अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास ईडी करीत आहे. तपासात सचिन सावंत यांच्याकडे ईडीला बेहिशोबी मालमत्ता सापडली आहे.

आयआरएस कॅडरचे अधिकारी सावंत हे यापूर्वी ईडीच्या मुंबई झोन २ मध्ये उपसंचालक म्हणून कार्यरत होते. सीमा शुल्क आणि अप्रत्यक्ष कर विभागात कार्यरत असलेले सचिन सावंत यांच्या मुंबईतील निवासस्थानावर ईडीने बुधवारी सकाळी छापा टाकला होता. भ्रष्टाचार आणि बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी, ही कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडे २.४५ कोटींची बेहिशोबी मालमत्ता सापडली असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

500 कोटी रुपये बेकायदेशीररित्या वळवण्याच्या एका प्रकरणातील आरोपीने आयआरएस अधिकारी सावंत यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार सीबीआयने एफआरआय दाखल होती. या तक्रारीवरुन ही कारवाई करण्यात आली आहे. 

आयआरएस अधिकारी सचिन सावंत यांच्यावर भ्रष्टाचार आणि मालमत्ता जमवल्याचा आरोप आहे. त्यांनी सदनिका घेण्यासाठी दीड कोटी रोख स्वरुपात दिल्याचे ईडीच्या तपासात आढळले आहेत. त्यांची सानपाड्यातील सदनिका त्यांच्या कुटुंबियांच्या नावावर आहे. तर गॅस त्यांच्या नावावर असल्याची माहिती समोर आली आहे. ईडीच्या पथकाने त्यांच्या नातेवाईकांच्या घराची झाडाझडती घेतली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.