Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

बी.टेक झालेल्या राणा प्रतापने आखला प्लॅन! रिलायन्स ज्वेल्स दरोडा प्रकरण

बी.टेक झालेल्या राणा प्रतापने आखला प्लॅन!
रिलायन्स ज्वेल्स दरोडा प्रकरण



सांगली : खरा पंचनामा

सांगलीतील रिलायन्स ज्वेल्सवरील दरोडा टाकणाऱ्या चौघांची नावे निष्पन्न झाली आहेत. असे आज पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मात्र या गुन्ह्यातील मुख्य संशयित प्रताप राणा हा बिहार पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याने पश्चिम बंगाल, हैद्राबाद येथील लोकांना हाताशी धरून हा दरोडा टाकल्याचे आतापर्यंत झालेल्या तपासात निष्पन्न झाले आहे. 

प्रताप राणा बी. टेक असल्याने त्याने कोणताही पुरावा मागे सोडलेला नाही. त्याला अत्याधुनकि तंत्रज्ञानाची अधिक माहिती आहे. त्यामुळे गुन्ह्याचे कट रचण्यापुर्वी पुरावे राहणार नाहीत, याचा विचार करण्यात आला आहे. बिहारमध्ये त्याला एका गुन्ह्यात अटक करण्यास गेलेल्या स्थानिक पोलिस पथकावर त्याने गोळीबार केला होता. टोळीतील सर्वच गुन्हेगार सराईत आहेत. हा टोळीचा म्होरक्या असण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले.

गणेश उध्दव बद्रेवार (वय २४, रा. हैद्राबाद), प्रताप अशोकसिंग राणा (वय २५, रा. वैशाली, राज्य - बिहार ), कार्तिक नंदलाल मुजुमदार (वय २३, रा. हुगळी, राज्य - पश्चिम बंगाल) आणि प्रिन्स कुमार सिंग (वय २४, रा. वैशाली, राज्य - बिहार ) यांच्यासह त्यांच्या काही अन्य साथीदारांनी रिलायन्स ज्वेलर्सवर दरोडा घातल्याचे निष्पन्न झाले आहे. 

दरोडेखोरांनी तीन महिन्यांपासून रेकी केली होती. मात्र दरोडा टाकण्याच्या ठिकाणपाहून चाळीस ते पन्नास किलोमीटर अंतरावर त्यांचे वास्तव्य असायचे, असे पोलिस तपासात पुढे आले. त्या अनुषंगाने तपास केला असता कोल्हापूर जिल्ह्यात त्यांनी वास्तव्य केल्याचे पोलिसांनी सांगितले.

हैद्राबादमध्ये झाली ओळख
हैद्राबाद शहरातील रामोजी फिल्म सिटीत कामासाठी बहुसंख्य कामगार हे परप्रांतिय आहेत. दरोड्यात सहभागी असणाऱ्या साथीदारांची काही महिन्यांपूर्वी तेथेच ओळख झाली असावी अशी पोलिसांची माहिती आहे.

या टोळीने देशातील विविध राज्यात आतापर्यत बऱ्याच ठिकाणी दरोडे टाकले असून प्रत्येक दरोड्याची मोडस एकच आहे.  दरोडा टाकण्यासाठी त्यांची स्वतंत्र टिम आहे. प्रत्येक गुन्हेगाराला त्याचे काम ठरवून दिल्याने अन्य दरोड्याचा पूर्ण प्लॅन टोळीतील प्रत्येकाला माहित नसतो. आपल्याला नेमून दिलेले काम करणे एवढेच काम टोळीतील प्रत्येकाकडे असते. कोणताही दरोडा टाकताना सुमारे तीन महिन्यांपासून संबंधित दुकानाची रेकी करण्यात येते. त्याप्रमाणे सांगलीत देखील दरोडा घालण्यापूर्वी संशयीत गणेश बद्रेवार याने शहरातील पेढीची रेकी केली होती. त्यानंतर हा दरोडा टाकण्यात आला. गुन्ह्यात वापरलेल्या वाहनांची खरेदी आरोपींनी ठाणे आणि गुलबर्गा येथून एका फायनान्स कंपनीमार्फत केली आहे. 

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.