सांगलीत अंमली पदार्थ विरोधी दिन विविध उपक्रमांनी साजरा
पोलिस दलातर्फे आयोजन
सांगली : खरा पंचनामा
सांगलीत अंमली पदार्थ विरोधी समिती आणि जिल्हा पोलिस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने अंमली पदार्थ विरोधी दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सांगलीतील विष्णूदास भावे नाट्यगृह येथे झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी होते. यावेळी डॉ. तेली, डॉ. दयानिधी, मनोविकार व व्यसनमुक्ती तज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर हळींगळे, महापालिकेचे आयुक्त सुनील पवार यांनी उपस्थित तरूण-तरूणी, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सोमवारी जिल्ह्यातील सर्वच पोलिस ठाण्यांमध्ये अंमली पदार्थ विरोधी दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्ह्यात प्रबोधन रॅली, प्रभात फेरी काढून जनजागृतीचे संदेश देण्याते आले. जिल्ह्यातील विविध शाळा, महाविद्यालयांमध्येही तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. पोलिस अधीक्षक कायार्लयाच्या सोशल मिडिया अकाऊंटवरूनही जनजागृती करण्यात आली.
सांगली शहरचे पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी स्वागत, प्रास्ताविक केले. एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी आभार मानले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.