सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीचे नवे कार्यकारी अध्यक्ष
नवी दिल्ली : खरा पंचनामा
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.
आज राष्ट्रवादीचा २५ वा वर्धापनदिन आहे. दिल्ली येथील कार्यक्रमात शरद पवार यांनी ही घोषणा केली आहे. दरम्यान गेल्या महिन्यात शरद पवार यांनी राजीनाम्याची घोषणा केली होती. त्यावेळी मोठी खळबळ उडाली होती.
त्यानंतर पक्षातील अनेक नेते, कार्यकर्त्यांनी पवार यांची मनधरणी केली होती. त्याचवेळी सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल यांच्यासह पाच नावांची अध्यक्षपदासाठी चर्चा होती. आता नव्या कार्यकारी अध्यक्षांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.