Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मनीषा कायंदे यांच्या आमदारकीच्या अपात्रेबाबाबत उज्ज्वल निकम म्हणाले...

मनीषा कायंदे यांच्या आमदारकीच्या अपात्रेबाबाबत उज्ज्वल निकम म्हणाले...



मुंबई : खरा पंचनामा

ठाकरे गटाच्या माजी प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी रविवारी शिंदे गटात पक्षप्रवेश केला आहे. मनिषा कायंदे या विधानपरिषदेच्या विद्यमान आमदार आहेत, असं असताना त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली जाऊ शकते का? यावर ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार, शिंदे गट हा शिवसेनेचा अधिकृत पक्ष आहे. शिंदे गटालाच अधिकृत पक्षाची मान्यता मिळाली आहे. त्यामुळे मनिषा कायंदे यांची अपात्रता मानली जाणार नाही, अशी प्रतिक्रिया उज्ज्वल निकम यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. 

निकम म्हणाले, "निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार, शिवसेनेचा अधिकृत पक्ष म्हणून शिंदे गटाला मान्यता मिळाली आहे. त्यामुळे विधानपरिषदेच्या विद्यमान आमदार मनिषा कायंदे यांनी आपण शिंदे गटात प्रवेश करत आहोत, असं जरी जाहीर केलं तरी त्यांची अपात्रता मानली जात नाही.

"याचं कारण म्हणजे, मनिषा कायंदेंचा युक्तिवाद असा असू शकतो की, मी शिवसेनेतच आहे. मी शिवसेना सोडली नाही. पण हा निर्णय अर्थात विधान परिषदेच्या सभापतींना घ्यायचा आहे. १० व्या परिशिष्टानुसार मनिषा कायंदे अपात्र ठरतात की नाही? याबाबतचा अंतिम निर्णय विधान परिषदेचे सभापतीच घेऊ शकतात," असंही उज्ज्वल निकम म्हणाले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.