Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

रत्नागिरी-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग झाला बंद!

रत्नागिरी-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग झाला बंद!



रत्नागिरी : खरा पंचनामा

राज्यभरात ठिकठिकाणी पाऊस जोरदार सुरु आहे. आज शुक्रवारी झालेल्या पावसामुळे रत्नागिरी-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील रत्नागिरी तालुक्यात पाली ते साखरपा गावादरम्यान नाणीज येथील माध्यमिक शाळेसमोरील रस्ता खचला आहे. 


रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार या राज्यमहामार्गाची दुरुस्ती होईपर्यंत बंद करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने चांगली हजेरी लावली आहे. ठिकठिकाणी पावसाने रस्ते खचले आहेत. खड्डे पडले आहेत. याचा परिणाम वाहतूक मार्गावरही झाला आहे. 

माहितीनुसार, रत्नागिरी-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ वरील रत्नागिरी तालुक्यात पाली ते साखरपा गावादरम्यान नाणीज येथील माध्यमिक शाळेसमोरील रस्ता खचला आहे. परिणामी नाणीज येथील माध्यमिक शाळेसमोरील रस्ता खचल्याने राज्यमहामार्ग रस्त्याची दुरुस्ती होईपर्यंत बंद करण्यात आला आहे आणि पर्यायी मार्ग, मुंबईकडून कोल्हापूरच्या दिशेने जाणारी वाहतूक पाली पासून लांजा - दाभोळ मार्गे कोल्हापूर दिशेने वळविण्यात आलेली आहे आणि कोल्हापूरकडून येणारी वाहतूक दाभोळ फाटा - लांजा मार्गाने वळविण्यात आलेली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.