Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

भाडखाऊ तुझा दाभोळकर केला जाईल!

भाडखाऊ तुझा दाभोळकर केला जाईल!



मुंबई : खरा पंचनामा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शरद पवार यांना ट्विटरद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या संदर्भात राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ पोलीस आयुक्तांच्या भेटीला दाखल झाल आहे.

'भाडखाउ तुझा दाभोळकर केला जाईल. अशा स्वरूपाची धमकी ट्विटर द्वारे देण्यात आली आहे. सौरभ पिंपळकर या ट्विटरवर हँडलवरुन ही धमकी देण्यात आली आहे.

मला व्हॉट्सअपवर हा मेसेज आला आहे. त्याचे जे फॉलोअर्स आहेत त्यामध्येही आक्षेपार्ह मेसेज आहेत. ज्या पद्धतीने धमकी देण्यात आली आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे. गृहमंत्र्यांनी तात्काळ लक्ष द्यावे अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. 
धमकी देणे हे आमच्या रक्तात नाही. जो कुणी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. औरंगजेबाचे स्टेटस ठेवून त्याचे उदात्तीकरण केल्याच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी बुधवारी पुकारलेल्या कोल्हापूर बंदला हिंसक वळण लागले होते. संभाजी नगर, अहिल्यानगर आणि आता कोल्हापूरमध्ये अशी घटना घडलेल्याने राज्यात तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे. या सर्व घडामोडीदरम्यान, भाजप नेते निलेश राणे यांनी शरद पवार यांच्यासंदर्भात वादग्रस्त ट्विट केले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.