Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

तक्रारीत नाव घातल्याच्या रागातून पोलिस पाटलाचा खून!

तक्रारीत नाव घातल्याच्या रागातून पोलिस पाटलाचा खून!



कोल्हापूर : खरा पंचनामा

पोलिस तक्रारीत नाव घातल्याचा रागातून कोयता, खुरप्याने सपासप वार करून पोलिस पाटलाचा निर्घृणपणे खून करण्यात आला. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील पोवाचीवाडी येथे शनिवारी रात्री ही घटना घडली.

संदीप ज्ञानदेव पाटील (वय 41) असे मृताचे नाव आहे. घटनेनंतर त्यांना  तात्काळ नेसरी  ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. 

देवाची रांगी नावाच्या शेतात शनिवारी  संशयित रोहित निवृत्ती पाटील याच्याशी भांडण सुरू असून त्याला समजावून सांगण्यासाठी सुरेश गुरव याने फोन करून पोलिस पाटील संदीप याला बोलावून घेतले. पोलिस पाटील संदीप हे गुरव यांच्या देवाची रांगी नावाच्या शेतात रोहित पाटील, निवृत्ती पाटील, अरूण पाटील व योगेश पाटील ( सर्व रा. पोवाचीवाडी ता. चंदगड ) यांना समजावण्यासाठी गेले होते.

त्यावेळी पूर्ववैमनस्यातून पोलिस तक्रारीत नाव घातल्याच्या रागातून चौघांनी मिळून संदीप यांच्यावर कोयता व खुरप्याने हातावर, डोकीत व मानेव वार केले.‌ यामध्ये संदीप यांचा जागीच मृत्यू झाला.
संशयित रोहित व शांताराम गावडा (रा. देवकांडगाव, ता. आजरा) या नातलगात मार्चमध्ये वाद झाला होता. यामध्ये रोहित व भावकीतील काहीजणांच्या विरोधात चंदगड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. त्यामध्ये पोलिस पाटील संदीप यानेच आपले नाव तक्रारीमध्ये घातल्याच्या रागातून हा खून झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.