अट्रोसिटीची खोटी फिर्याद देणाऱ्यावर फौजदारी कारवाईचा आदेश
शासनामार्फत मिळालेले अनुदानही वसुलीचे आदेश
सांगली : खरा पंचनामा
अट्रोसिटीच्या गुन्ह्यात फिर्यादीच फितूर होऊन शपथेवर खोटी साक्ष दिल्याने फिर्यादिवर फौजदारी प्रक्रिया संहिता कलम ३४० प्रमाणे कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. शिवाय फिर्यादीला या प्रकरणात शासनाकडून मिळालेली दीड लाखांचे अनुदान वसूल करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. तदर्थ जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती एम. एम. पाटील यांनी हे आदेश दिले आहेत. सरकार पक्षाकडून अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील रियाज जमादार यांनी काम पाहिले.
प्रदीप विक्रम रास्ते (वय २३, रा. बलगवडे, ता. तासगाव) याच्याविरोधात कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रास्ते याने दि. २६ सप्टेंबर २०२० रोजी तासगाव पोलिस ठाण्यात सौरभ रावसाहेब शिंदे यांच्याविरोधात जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याची तसेच पत्नीलाही ढकलून जातीवाचक केल्याची फिर्याद दिली होती. त्यानंतर शपथेवर सरतपास दिला होता. त्यामध्ये खरी वस्तुस्थिती सांगितली होती. त्यानंतर उलट तपासामध्ये संशयित शिंदे यांच्याशी संगनमत करून त्याला मदत व्हावी यासाठी सरतपासाच्या विरोधी जबाब दिला.
उलट तपासामध्ये शिंदे यांनी रास्ते याने त्यांच्याकडे दारूसाठी पैशांची मागणी केली होती. पैसे न दिल्याचा राग आल्याने शिंदे यांच्याविरोधात खोटी फिर्याद दिल्याचे रास्ते याने उलट तपासात मान्य केले. त्यानंतर अड. यांनी त्यावर युक्तीवाद केला. त्यानंतर न्या. पाटील यांनी रास्ते याच्याविरोधात फौजदारी कारवाई करण्याचे तसेच शासनाचे अनुदान वसूल करण्याचे आदेश दिले आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.