Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

चांदोली राष्ट्रीय उद्यान उद्यापासून होणार बंद!

चांदोली राष्ट्रीय उद्यान उद्यापासून होणार बंद!



शिराळा : खरा पंचनामा

पश्चिम महाराष्ट्रासह राज्यभरातील पर्यटकांचे आकर्षण असलेले चांदोली राष्ट्रीय उद्यान उद्या म्हणजेच १५ जुन पासुन पर्यटकांसाठी बंद होणार आहे. दि. १५ ऑक्टोंबरपर्यंत ते पर्यटनासाठी बंद राहणार असल्याचे वनविभागातर्फे सांगण्यात आले.

चांदोली राष्ट्रीय उद्यान पर्यटकांच्या वाढत्या पर्यटनामुळे संपूर्ण राज्यात प्रसिद्ध झोतात आले आहे. या उद्यानातील पर्यटनासाठी वनविभागाने बस सेवा सुरु केल्याने या उद्यानास भेट देणाऱ्या पर्यटकांमध्ये वाढ झाली आहे.

गेल्या पाच महिन्यात सुमारे पाच हजार पर्यटकांनी या उद्यानास भेट देऊन येथील निसर्गरम्य पर्यटनाचा आनंद लुटल्याची नोंद या विभागाच्या कार्यालयाकडे झाली आहे. सुट्टीमुळे मे महिन्यात सर्वात जास्त पर्यटकांनी भेट दिली.

प्रशासनाच्यावतीने दरवर्षी १५ जुन पासुन हे उद्यान पर्यटकांसाठी बंद ठेवले जाते. पावसाळा संपल्यानंतर १५ ऑक्टोंबर पासून चांदोली राष्ट्रीय उद्यान पुन्हा पर्यटनासाठी खुले केले जाते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.