सचिन डोंगरेचा कारागृहातून घेतला ताबा : कळंबा जेलमधून मोबाईलवर होता संशयितांच्या संपर्कात!
डोंगरेचा गॉडफादर तो 'सचिन' कोण?
सांगली : खरा पंचनामा
राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आणि पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार नालसाब मुल्ला याच्या खून प्रकरणतील मुख्य सूत्रधार सचिन डोंगरे याचा शनिवारी सांगली पोलिसांनी कळंबा कारागृहातून ताबा घेतला. सचिन डोंगरे नालसाबच्या खुनातील संशयितांसोबत मोबाईलवर संपर्कात होता अशी माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड झाल्याचे समजते. दरम्यान दरम्यान सचिन डोंगरेचाच एक सचिन नावाचा गॉडफादर कोण आहे याची चर्चा सध्या सुरू आहे. डोंगरेकडील चौकशीतूनच यातील अनेक बाबी उघड होणार आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील कळंबा कारागृहातून सचिन डोंगरे याने एकच मोबाईल क्रमांक विविध मोबाईलवरून वापल्याचे तपासात समोर आल्याचे समजते. त्यानंतर विश्रामबाग पोलिसांनी कारागृहाची झडती घेतली. एक महिन्यापासून तो संपर्कात असून खुनाचा कट शिजत होता. नालसाबच्या खूनप्रकरणी सनी कुरणे (जयसिंगपूर, ता. शिरोळ), विशाल कोळपे (लिंबेवाडी, ता. कवठेमहांकाळ) व स्वप्निल मलमे (खरशिंग, ता. कवठेमहांकाळ), रोहित मंडले (खरशिंग), प्रशांत ऊर्फ बबलू चव्हाण, ऋत्विक माने (रा. कोकळे, कवठेमहांकाळ) यांना यापुर्वी अटक केली आहे. तर एका अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले आहे.
गेल्या शनिवारी नालसाब त्याच्या घरासमोर तो थांबला असताना दुचाकीवरून आलेल्या चौघांनी गोळीबार केला. मुल्लाच्या छाती व पोटावर गोळ्या झाडल्यानंतर हल्लेखोर पसार झाले. एडक्याने वार केले. दरम्यान, एलसीबीच्या पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. तिघांना अटक केली. मलमे तीन साथीदारांसह माने चौकात आला. स्वप्निल व सनी यांनी आठ गोळ्या झाडल्या. विशाल कोळपेने धारदार एडक्याने हल्ला चढवला. त्यात मुल्लाचा मृत्यू झाला. हल्लेखोरांच्या मदतीसाठी आणखी तिघे दबा धरून बसल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली. दबा धरून बसलेले तिघेजण कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात हजर झाल्यानंतर विश्रामबाग पोलिसांनी त्यांचा ताबा घेऊन अटक केली.
दरम्यान, खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार सचिन डोंगरे हा ‘मोका’ कारवाईअंतर्गत कळंबा जेलमध्ये आहे. तेथूनच त्याने कट रचल्याची कबुली हल्लेखोरांनी दिली. त्यानुसार मोका न्यायालयाच्या परवानगीनुसार त्याला आज विश्रामबाग पोलिसांनी त्याचा ताबा घेतला आहे. त्याला आज दुपारी सांगलीत आणण्यात आले आहे. त्याच्याकडे प्राथमिक चौकशी केल्यानंतर डोंगरे हा कळंबा जेलमधून मोबाईलवरून संपर्कात असल्याचे स्पष्ट झाले आहे. पण सचिन डोंगरेचा सचिन नावाचा गॉडफादर कोण आहे हे शोधणे पोलिसांसमोर आव्हान आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.