Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीतील भावी वकिलाचा कागलजवळ खून!

सांगलीतील भावी वकिलाचा कागलजवळ खून!



कोल्हापूर : खरा पंचनामा

कागल तालुक्यात निढोरी रस्त्यावरील बामणी येथे एका तरुणाचा खून झाल्याचा प्रकार आज उघडकीस आला. या तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार केल्याच्या खुणा आहेत. मृत तरुण कोल्हापूर येथील लॉ कॉलेजमध्ये शिकत होता. भावी वकिलाचा खून झाल्याने खळबळ उडाली आहे.

अमरसिंह दत्ताजीराव थोरात (वय ३०, रा. गोटखिंडी ता. वाळवा, सांगली) असे मृत तरुणाचे नाव आहे. कागल-निढोरी राज्य मार्गावर गोटखिंडी येथील तरुणास बामणी हद्दीत मारून शेतात मृतदेह आणून टाकला होता. आज गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. सुरुवातीला मृताची ओळख पटली नव्हती. घटनास्थळी कागल पोलिसांना पंचनामा करताना या तरुणाच्या खिशात ड्रायव्हिंग लायसन्स सापडले. त्यावरून मृताची ओळख पटली.

कोल्हापूर येथील शहाजी लॉ कॉलेज मध्ये तो शिकत असल्याचे समजते. दरम्यान बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास या ठिकाणी एक कार थांबल्याचे काही नागरिकांनी पाहिले होते. याचवेळी हा मृतदेह या गाडीतून शेतात टाकला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.