Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मनसुख हिरेनच्या खूनाआधी प्रदीप शर्मा-सचिन वाझेची गुप्त बैठक!

मनसुख हिरेनच्या खूनाआधी प्रदीप शर्मा-सचिन वाझेची गुप्त बैठक!



मुंबई : खरा पंचनामा

मनसुख हिरेन खून प्रकरणात एनआयएने कोर्टात मोठा खुलासा केला आहे. बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांची 28 फेब्रुवारी 2021 रोजी मलबार हिल येथे एक गुप्त बैठक झाली, जिथे त्यांनी ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन यांना संपवण्याचा निर्णय घेतला आणि या बैठकीत शर्मा यांना हे काम सोपवण्यात आले, असा खळबळजनक दावा एनआयएने केला आहे.

एनआयएकडून वाझे यांच्या जामीन अर्जावर आक्षेप घेत विशेष न्यायालयात गुरुवारी सविस्तर उत्तर देण्यात आलं. अँटिलियाबाहेर स्फोटके ठेवल्या प्रकरणी कनेक्शन असल्याच्या आरोपात वाझे यांना अटक करण्यात आली होती. 25 फेब्रुवारी 2021 रोजी, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील घर, अँटिलियाच्या बाहेर एक महिंद्रा स्कॉर्पिओ आढळली होती. ज्यामध्ये तब्बल 20 जिलेटिनच्या कांड्या असलेली बॅग आढळून आली होती.

तसेच अंबानी कुटुंबातील सदस्यांना धमकी देणारी चिठ्ठी देखील होती. तसेच या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह 5 मार्च रोजी मुंब्राजवळील खाडीत सापडला होता. एनआयएच्या खटल्यानुसार, हिरेन यांच्या मालकीची कार वाझे यांनी अंबानी कुटुंबाच्या निवासस्थानाबाहेर पार्क केली होती. तसेच एनआयएने दावा केला की, हिरेन यांना या कटाबद्दल बरीच माहिती असल्याने आणि त्यांनी या कटाबद्दल कुठे वाच्यता केल्यास शर्मा, वाझे आणि बडतर्फ पोलिस अधिकारी सुनील माने यांना त्यांच्या या कटातून लाभ मिळवणे अवघड गेले असते.

एनआयएने पुढे सांगितले की, अंबानींच्या घराबाहेर वाहन लावल्यानंतर दोन दिवसांनी शर्मा आणि वाझे यांची मलबार हिल येथे गुप्त बैठक झाली. एजन्सीने म्हटले आहे की कॉल डिटेल रेकॉर्डवरून ही माहिती कन्फर्म झाली आहे. एजन्सीने असा दावा केला आहे की या बैठकीत हिरेन यांना संपवण्याचा निर्णय घेण्यात आला होता आणि हे काम शर्मा यांना देण्यात आले होते आणि ते त्याबद्दल अधिक चर्चा करण्यासाठी हे वरळी सी फेस येथे गेले होते.

एनआयएने दावा केला की जेव्हा त्यांनी पहिल्यांदा वाझे यांना चौकशीसाठी बोलावले तेव्हा त्यांनी या प्रकरणात आपली भूमिका नाकारली आणि तपासात दिशाभूल केली. एनआयएने असा दावाही केला आहे की वाझे खूप प्रभावशाली होते आणि म्हणूनच हिरेन यांचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला नव्हता.

तर या घटनेत अपघाती मृत्यूची नोंद केली होती. ते पुढे म्हणाले की अटक करण्यापूर्वी वाझे हे सीआययू युनिटचे प्रमुख होते, त्यामुळे जामिनावर सुटल्यास ते साक्षीदारांचा शोध घेऊन त्यांना प्रभावित करू शकले असते. दरम्यान, एनआयएला उत्तर दाखल करण्यास बराच वेळ लागल्याने वाझे यांनी तात्काळ अंतरिम जामिनावर सोडण्यासाठी दुसरा अर्ज केला. 11 एप्रिल रोजी याचिका दाखल केली होती, त्यावर दोन आठवड्यांत निर्णय व्हायला हवा होता, अशी विनंती त्यांनी केली. मात्र, एनआयएने त्यांचे उत्तर दाखल करण्यास वेळ घेतला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.