सांगली महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी लाचलुचपतच्या रडारवर!
सांगली : खरा पंचनामा
अग्निशमन यंत्रणा बसविल्याचा अंतिम ना हरकत दाखला देण्यासाठी सव्वालाख रुपयांची लाच घेणारा महापालिकेचा प्रभारी अग्निशमन अधिकारी विजय पवार प्रकरणात पालिकेतील काही अधिकारी कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या चौकशीच्या 'रडार'वर आहेत. दरम्यान तपासाचा भाग म्हणून काही जणांची चौकशी सुरू असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले.
लाचलुचपत विभागाने चौकशीसाठी हजर रहावे, यासाठी दोन अधिकारी व दहा कर्मचाऱ्यांना नोटीस बजावली होती. यातील काही एक अधिकारी व चार कर्मचारी सांगलीतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहिले होते. त्यांची कसून चौकशी करून जबाब नोंदवून घेण्यात आले.
शुक्रवारीही काही जण चौकशीला हजर राहतील, असे सांगण्यात आले. दरम्यान अटकेत असलेल्या विजय पवार याने चौकशीला कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. त्याच्या पोलिस कोठडीची शुक्रवारी मुदत संपत आहे. त्याला पुन्हा न्यायालयात उभे केले जाणार आहे.
दरम्यान अग्निशमन विभागासह अन्य कोणत्या विभागातील अधिकारी, कर्मचारी हे पवार याच्या संपर्कात होते का? तसेच ना हरकत दाखला देण्याच्या प्रक्रियेत कोणी वरिष्ठ अधिकारी सहभागी आहेत का? तसेच पवार याला कोणाचे अभय होते याचा तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.