सचिन डोंगरनेच दिली सुपारी : पिस्तूलासह हत्यारे, दुचाकी जप्त, तिघांना पाच दिवसांची कोठडी
नालसाब मुल्ला खून प्रकरण
सांगली : खरा पंचनामा
पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार, राष्ट्रवादीचा कार्यकर्ता नालसाब मुल्ला याचा खून प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली. त्यांनी गुन्ह्यात वापरलेली दोन गवाठी पिस्तूले, धारधार शस्त्रे आणि दुचाकी जप्त करण्यात आली. तिघांना पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान सचिन डोंगरे यानेच त्यांना सुपारी दिल्याची कबुली त्यांनी दिली आहे.
सनी कुरणे, विशाल कोळपे, स्वप्निल संतोष मलमे यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली, तर अल्पवयीन मुलाची सुधारगृहात रवानगी करण्यात आली. नालसाब मुल्ला याचे शंभर फुटी रस्त्यावर बाबा चौकात निवासस्थान आहे. शनिवारी तो वाचनालयाजवळ थांबला होता. तेव्हा अंधारात दुचाकीवरून आलेल्या चौघांनी त्याच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. नंतर त्याच्या डोक्यात तलवारीने वार केले. नंतर हल्लेखोर पसार झाले.
सन २०१९ मध्ये शहरातील महावीर कॉलनीत गँगची दहशत निर्माण करण्यासाठी महेश नाईक याचा खून
झाला होता. शंभर फुटीवरील जॉय ग्रुपचा प्रमुख सचिन डोंगरेसह ११ जणांना अटक झाली. त्यानंतर संशयितांवर मोकाअंतर्गत कारवाई करण्यात आली. खुनाचा कट रचल्याप्रकरणी नालसाबवरही कारवाई करण्यात आली होती. डोंगरेने मुल्लाचे नाव घेतल्याने कारवाई झाली होती. हा राग मुल्लाच्या मनात होता.
मुल्ला जामीनावर सुटल्यानंतर तो डोंगरेचा जामीन होऊ नये म्हणून प्रयत्न करत होता. त्यामुळे डोंगरेच्या मनात राग होता. त्याने स्वप्निल मलमेकडून सांगलीत काटा काढण्याचे ठरवले. त्यानुसार मलमे याने तीन साथीदारांसह माने चौकात आला. स्वप्निल व सनी यांनी पिस्तुलातून आठ गोळ्या झाडल्या. विशाल कोळपेने तलवारीने डोक्यात वार केला. त्यात मुल्लाचा मृत्यू झाला. हल्लेखोरांनी खुनाची कबुली दिली आहे. सचिन डोंगरे यानेच नालसाबच्या खुनाची सुपारी दिल्याचे स्पष्ट झाले आहे. आता डोंगरे याला अटक करण्यासाठी पोलिसांनी हालचाली सुरू केल्या आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.