Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

करजगीच्या तलाठ्याला ५० हजारांची लाच घेताना अटक नऊ वर्षात दुसऱ्यांदा झाली कारवाई

करजगीच्या तलाठ्याला ५० हजारांची लाच घेताना अटक
नऊ वर्षात दुसऱ्यांदा झाली कारवाई



सांगली : खरा पंचनामा

जत तालुक्यातील करजगी येथे बांधकामासाठी आणलेल्या वाळूचा साठा बेकायदा असल्याचे सांगत कारवाई न करण्यासाठी पन्नास हजारांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. नऊ वर्षात त्याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दुसऱ्यांदा कारवाई केली आहे. मंगळवारी दुपारी सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. याबाबत उमदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाळासाहेब शंकर जगताप (वय ५७, रा. गुड्डापूर रोड, आसंगी) असे अटक केलेल्या तलाठ्याचे नाव आहे. यातील तक्रारदार यांनी त्यांच्या घराच्या बांधकामासाठी वाळू आणली होती. बांधकामाच्या ठिकाणी त्यांनी वाळूचा साठा करून ठेवला होता. तो साठा बेकायदा असून त्यावर कारवाई न करण्यासाठी जगताप यांनी तक्रारदाराकडे पन्नास हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली. त्यानंतर तक्रारदाराने याबाबत सांगलीतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची पडताळणी केल्यानंतर जगताप याने लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर मंगळवारी दुपारी जगताप याला पन्नास हजारांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले.

जगताप याला २०१४ मध्ये खरेदी दस्ताची नोंद घेऊन सातबारा देण्यासाठी दहा हजार रूपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले होते. त्यावेळी त्याच्याविरोधात मिरज शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत अद्यापही न्यायालयात खटला सुरू आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक दत्तात्रय पुजारी, विनायक भिलारे, प्रीतम चौगुले, ऋषिकेश बडणीकर, अजित पाटील, सलीम मकानदार, सुदशर्न पाटील, रविंद्र धुमाळ, पोपट पाटील, सीमा माने, उमेश जाधव, रामहरी वाघमोडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.