एकनाथ शिंदेना सर्वाधिक पसंती भाजपने मान्य करावी : जयंत पाटील
सांगली : खरा पंचनामा
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक सर्व्हे केला आहे. ज्यात त्यांना सर्वाधिक पसंती असल्याचा दावा करण्यात आला आहे. भाजपने त्यांचं ऐकावं आणि त्यांचं नेतृत्व मान्य करावं असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला.
पाटील यांनी आज मंगळवारी विविध प्रश्नांवर पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांची भेट घेतली. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, शिंदे साहेबांनी केलेला सर्व्हे भाजपनं मान्य करावा. तसेच त्यांना अधिक पसंती असल्याने त्यांचे नेतृत्वही मान्य करावे. त्यांच्या सर्वेनुसार ते सर्वाधिक पसंतीचे नेते असल्याने भाजपने त्यांच्या पक्षाला ते मागतील तेवढ्या जागा द्याव्यात अशी आमची उपसूचना आहे, अशी मिश्किल टिपणीही पाटील यांनी केली.
आगामी निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाचा महाविकास आघाडीसमोर टिकाव लागणार नाही. त्यातील अंतर कसे कमी करायचे याचा प्रश्न समोरच्या बाजूला आहे. शिंदे यांचा सर्व्हे खरा ठरो अशी आमची शुभेच्छा आहे, असेही पाटील यावेळी म्हणाले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.